जागतिक आरोग्य दिन: प्रवासामध्ये आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी ५ टीप्स

प्रत्येकालाच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून थोडासा ब्रेक घ्यायची, आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा असते. पण प्रवासादरम्यान आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवासातील खाद्यपदार्थांमुळे आजारी पडण्याची भिती असते. 

Updated: Apr 7, 2015, 09:03 AM IST
जागतिक आरोग्य दिन: प्रवासामध्ये आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी ५ टीप्स title=

मुंबई: प्रत्येकालाच आपल्या बिझी शेड्यूल्डमधून थोडासा ब्रेक घ्यायची, आपल्या आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा असते. पण प्रवासादरम्यान आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण प्रवासातील खाद्यपदार्थांमुळे आजारी पडण्याची भिती असते. 

आज ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे. हे वर्ष सुरक्षित आहार वर्ष आहे. म्हणून प्रवासामध्ये आपलं आरोग्य कसं सांभाळाल यासाठीच्या या खास ५ टीप्स 

१. प्रवासामध्ये गरम आणि ताजा आहार घेण्याची काळजी घ्या. प्रवासात फ्रोजन जेवण, चीजचे पदार्थ आणि अनसिल्ड मायोनिज घेऊ नका, कारण त्यात खूप बॅक्टेरिया असतात. 

२. प्रवासात शक्य असेल तर शांत ठिकाणी किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवा, अतिशय गर्दीच्या ठिकाणी जेवणं टाळा.

३. प्रवासामध्ये सिल्ड बॉटलमधील पाणी प्या, किंवा घरातून पाणी घेऊन जा. पण प्रत्येकवेळी बॉटलला सिल्ड आहे की नाही चेक करा. पाणी आरोग्यदायी आहे की नाही हे चेक करून घ्या. 

४. कापलेली फळं सोबत घेतली असेल तर प्रवासात खाऊ नका. कारण त्यावर खूप इन्फेक्शन असू शकतं. त्याऐवजी ताजी फळं घ्या आणि संबंध एक फळ एकट्यानं खाण्याचा प्रयत्न करा. उदा. १ सफरचंद एकट्यानंच खा. 

५. अखेरचं पण महत्त्वाचं प्रवासात नेहमी आपल्यासोबत हँड वॉश किंवा हँड सॅनिटायझर ठेवा. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. म्हणजे तुम्हाला फुड पॉइजनिंग किंवा इन्फेक्शन होणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.