काजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे तुम्ही जरुर जाणून घेतले पाहिजेत?

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.

Updated: Aug 31, 2016, 10:30 AM IST
काजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे तुम्ही जरुर जाणून घेतले पाहिजेत? title=

मुंबई : काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.

काजूत प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अॅंटीऑक्सीडेंट असल्यामुळे रोजच्या खाण्याच्या पदार्थात काजूला प्राधान्य दिले पाहिजे.

निरोगी हृदयासाठी 

काजू आपल्या हृदयासाठी खूप फायदेशील आहे. काजू हा नैसर्गिक कोलेस्ट्राल फ्री आहे. हेल्दी हार्ट फॅट्स, फायबरयुक्त, प्रोटीन आणि आर्जीनिसयुक्त परिपूर्ण आहेत. त्यामुळे रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करतो.

हाडे मजबूत होण्यास मदत
काजूत मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, मॅग्निशिअम आणि पॉटेशिअम भरपूर असते. त्यामुळे हाडांची झिज रोखण्यास काजू मदत करतो. काजूत प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.

डोळ्यांचे आरोग्य
काजूत ल्यूटेन आणि जियाएक्सांथिन (एंटीऑक्सीडेंट) चांगल्याप्रमाणात मात्रा असते. त्यामुळे डोळ्यांची नजर कमी होण्यापासून बचाव होता. मोती बिंदू होण्यापासून काजू सुटका करते.

रक्त रोग
काजूत कॉपरची मात्रा जास्त असते. त्यामुळे आपले रक्त रोगांचा मुकाबला करण्यासाठी मदत करते. रक्तात कॉपरची मात्रा तसेच लोह कमी असेल तर एनिमिया रोग होऊ शकतो. त्यामुळे काजू खाणे महत्वाचे असते.

वजन कमी करण्यास मदत
करण्यात आलेल्या संशोधनानंतर काजूमुळे वजन नियंत्रणात राहते. काजूत कोलेस्ट्रॉल कमी असल्याने चरबी देखील वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.