धक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!

बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 9, 2013, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ऍरिझोना
बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेंदू असा वाहून जाऊ शकतो, हे या प्रकरणातून प्रथमच समोर आले आहे.
डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार अरिझोनातील जोइ नागी या माणसाच्या नाकातून गेली १८ महिने पाणी गळत होतं. वातावरणातील फरकामुळे सामान्य सर्दी झाली असेल, असा त्यांचा दाज होता. मात्र हळुहळू हा त्रास एवढा वाढला की नाकाला रुमाल लावूनच त्याला फिरावं लागे. काही प्रमाणात रक्तही त्याच्या नाकातून गळत होतं. आणि डोकं दुखू लागे. डोळ्यांतून अश्रू वाहातात, तसं नाक गळू लागलं होतं
अखेर डॉक्टरांनी जोइला एक्स रे काढायला लावला. आणि त्यातून डॉक्टरांसमोर एक धक्कादायक प्रकार आला. जोइच्या मेंदूला बारीक छिद्र पडलं असून त्यातून एक पातळसा पदार्थ नाकाद्वारे स्त्रवत होता. अरिझोनातील वातावरण आणि तापमान सहन न झाल्याने त्याला ही ऍलर्जी झाल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. त्याची सर्जरी केल्यावर थेंबा थेंबाने वाहाणारा मेंदू नियंत्रणात आला आहे. मात्र अजूनही ऑपरेषननंतर त्याची परिस्थिती गंभीर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.