मुंबई : मसाल्यात वापरण्यात येणाऱ्यापैकी एक काळे मिरे (काळी मीरी). या काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे. त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. मसाल्यात तिखट म्हणून याचा वापर केला जातो.
हे काळे मिरे जगात सर्वत्र पिकत नाही. मात्र, भारतात मोठ्याप्रमाणात पिकते. हे औषधी काळे मिरे अल्यामुळे जगभरातून याला मागणी आहे.
१. काळे मिरे आणि वेलदोडा (विलायची) समप्रमाणात घेऊन भुकटी करुन ती घेतल्यावर हगवणीवर गुणकारी ठकरे.
२. मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूकही वाढते.
३. काळे मिरेची पावडर कर्करोग आणि पित्तविरोधी आहे.
४. पित्तामुळे पोटात गुडगुड किंवा भगभग होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
५. डेंगी (डेंग्यू) तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिरीचा मारक परिणाम होतो. डासांची अंडी मिरीमुळे नष्ट होण्यास मदत होते.
६. मिरीमध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो. आणि पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे व्यक्तीच्या प्रकृतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात.
दरम्यान, काळ्या मिरीवर संशोधन करण्यात येत आहे. पायपॅरीनवर कॅन्सर प्रतिबंधक औषध म्हणून संशोधन करण्यात येत आहे. पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचा नायनाट करु शकते. तसेच पायपॅरीन हे जनावरांनासुद्धा उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.