www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
कारले म्हटले अनेक जण तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर....ते नक्कीच खा. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून मधुमेह, मुतखडासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.
कारलं साखरेत घोळलं तरी त्याचा कडूपणा गेला नाही तरी कारले विविध आजारांवर कसे गुणकारी ठरले आहे. कारले यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते यकृत स्वच्छ ठेवते आणि त्याच्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे यकृत दीर्घकाळापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते.
टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय गुणकारी आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत करते. तर तुमचे वजन वाढले आहे का, लठ्ठपणा आहे का? त्यावर कारले गुणकारी ठरते. कारले पचनासाठी उत्तम आहे. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स चयापचय क्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. खुद्द कारल्यात अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात. वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कारले हवेच.
मुतखड्याच्या रुग्णांसाठी कारले उपयुक्त आहे. कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मुत्राच्या मार्गाने बाहेर पडू शकतात. तर तारुण्यपिटिकेसाठी ते म्हणाचे ठरले आहे. कारल्यात अँटी इन्फ्लामेट्नी गुण आहेत जे त्वचेतून हानीकारक घटकांना दूर करतात. त्यामुळे तारुण्यपिटिका किंवा त्वचेवरील पुटकुळ्यांची समस्या दूर होते.
कारले नियमितपणे कारल्याचे सेवन केल्यास दमा आणि ब्रोंकाईटिससारख्या श्वासासंबंधी गंभीर आजारांवर मात करू शकता. कर्करोगाशी सामना करण्यासाठी कारले गुणकारी आहे हे आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते शरीराला मदत करते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.