अवघ्या १३ दिवसांत बनवा पीळदार दंड

पीळदार शरीरयष्टी असलेल्या मुलांकडे नेहमीच मुली आकर्षित होतात. त्यामुळे पीळदार शरीर कमावण्यासाठी तरुण मुले जिमचा मार्ग धरतात. मात्र केवळ वर्कआऊटने शरीर कमावता येणार नाही त्यासाठी योग्य तो आहार घेणे गरजेचे असते. 

Updated: Mar 3, 2016, 12:09 PM IST
अवघ्या १३ दिवसांत बनवा पीळदार दंड title=

मुंबई : पीळदार शरीरयष्टी असलेल्या मुलांकडे नेहमीच मुली आकर्षित होतात. त्यामुळे पीळदार शरीर कमावण्यासाठी तरुण मुले जिमचा मार्ग धरतात. मात्र केवळ वर्कआऊटने शरीर कमावता येणार नाही त्यासाठी योग्य तो आहार घेणे गरजेचे असते. 

खालील टिप्समुळे् तुम्ही दोन आठवड्यात पीळदार दंड कमावू शकता

जिममध्ये गेल्यानंतर संपूर्ण लक्ष दंड कसे मजबूत करता येतील यावर लक्ष केंद्रित करा. दंड मजबूत करण्यासाठी बायसेप्स, ट्रायसेप्स आणि फोरआर्म्स असे व्यायाम करा. 

जिममध्ये वर्कआऊट करताना अधिक जाडीच्या बारचे हँडल वापरा. यामुळे तुमचे दंड पीळदार बनण्यास मदत होते. 

मजबूत दंड बनवण्यासाठी उत्तम व्यायाम म्हणजे फोरआर्म्स. यामुळे हात मजबूत होतात. 

नेहमी व्यायाम करताना एल्बोकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेकदा व्यायामादरम्यान एल्बोला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्कआऊट करताना नेहमी एल्बोकडेही लक्ष द्या.

बायसेप्स बनवण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक व्यायाम गरजेचा आहे. 

हात मजबूत बनवण्यासाठी नेहमी पुशअप्स करा. पुशअप्स करताना शरीराचा भार हातांवर असतो यामुळे दंड अधिक मजबूत होतात. तसेच यासाठी कोणत्याही व्यायामाच्या साधनसामुग्रीची गरज नसते. 

ट्रायसेप्स आणि बायसेप्स करण्यावरही अधिक भर द्या. यामुळे तुमचे एल्बो मजबूत होतील.