कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स

लठ्ठपणा शरीरातील आजारांना निमंत्रण देण्याचं काम करतं. लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा होणारी अधिकची चरबी असते, ज्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळं अनेक आजार होतात. 

Updated: Jul 7, 2015, 04:59 PM IST
कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स title=

मुंबई: लठ्ठपणा शरीरातील आजारांना निमंत्रण देण्याचं काम करतं. लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा होणारी अधिकची चरबी असते, ज्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळं अनेक आजार होतात. 

ज्या व्यक्तीचा BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स 25 ते 29.9 दरम्यान आहे, त्याला डॉक्टरी भाषेत ओव्हरवेट म्हणजे अधिक वजनदार म्हणतात. तर दुसरीकडे जेव्ही BMI 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्याला लठ्ठपणा म्हणतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवण्या-खाण्यात सुधारणा करणं गरजेचं आहे.

काही नैसर्गिक अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सेवनानं वजन नियंत्रित राहतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवणावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. काही व्यायाम आणि योगासनं केल्यानं लठ्ठपणा कमी नियंत्रित ठेवता येतो. 

जर आपण वजन कमी करण्यासाठी रोज मेहनत घेऊ शकत नाही तर या छोट्या-छोट्या खास टीप्स

# जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यानं वजन झपाट्यानं कमी होतं. मात्र जेवणानंतर जवळपास पाऊस तास किंवा एका तासानंतर एक ग्लास पाणी प्यावं.

# कच्ची किंवा पिकलेली पपई खावी. त्यानं शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजन घटतं.

# दह्याचं सेवन केल्यानं शरीरातील अधिकची चरबी कमी होते. ताक किंवा छास दिवसातून दोन-तीन वेळा करणं लाभदायक ठरतं.

# छोटी पीपलचं बारीक चूर्ण करून कपड्यानं चाळून घ्यावं. हे चूर्ण तीन ग्राम दररोज सकाळी ताकासोबत घेतल्यानं बाहेर निघालेलं पोट आत जातं. 

# गरम पाण्यात लिंबाचा रस आणि सहद घालून रोज सकाळी उपाशी पोटी प्यावं. त्यामुळं पोट चांगलं राहतं आणि लठ्ठपणा दूर होतो. 

# ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे लठ्ठपणा कमी करण्यासोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतात. ग्रीन टी सारखेशिवाय प्यायल्यानं फायदा अधिक लवकर होतो. 

# अॅपल सायडर वेनिगरला पाणी किंवा ज्यूससोबत मिसळून पिल्यानं लठ्ठपणा कमी होतो. आपल्या पचनक्रियेला ते नीट ठेवतो आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करतो.

# एका रिसर्चनुसार वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय मिर्ची खाणं होय. हिरव्या किंवा काळ्या मिर्चीत आढळणारे तत्त्व कॅप्साइसिनमुळे भूख कमी होते. त्यामुळं ऊर्जा अधिक खर्च होते आणि वजन कंट्रोलमध्ये राहतं. 

# दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे सहद मिसळून प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते. 

# दररोज पत्ताकोबीचा ज्यूस प्यावी. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करण्याचे गूण असतात. त्यामुळं शरीराचं मेटाबॉलिजम योग्य राहतं.

# सकाळी उठताच 250 ग्राम टमाटरचा रस 2-3 महिने प्यायल्यानं चरबी कमी होते.

# एक चमचा पुदीन्याचा रस 2 चमचे सहदात मिसळून पिल्यानं लठ्ठपणा कमी होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.