शाकाहारी व्हा....हृद्यरोग टाळा

तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगायचयं का? मग तुम्हाला शाकाहारी व्हावं लागेल. कारण संशोधकांनी असं शोधून काढलयं की, मांसाहारी व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींमध्ये हृद्यरोग होण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते.

Updated: Jun 15, 2013, 07:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगायचयं का? मग तुम्हाला शाकाहारी व्हावं लागेल. कारण संशोधकांनी असं शोधून काढलयं की, मांसाहारी व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींमध्ये हृद्यरोग होण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते. आणि त्यापासून होणा-या मृत्यूचे प्रमाणही कमीच.
‘क्लिनीकल न्यूट्रीशियन’ नावाच्या अमेरिकन मासिकात असं म्हटलं गेलंय. ‘युनिर्व्हसिटी ऑफ ऑक्सफर्ड’मधील फ्रान्सिस्को क्त्रोवी यांनी आपल्या साथीदारासोबत मिळून १९९० च्या सुरुवातीस ब्रिटन आणि स्कॉटलंडमध्ये राहणा-या ४५ हजार लोकांचे नियमित जेवण आणि त्यांची जीवनशैली याची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. ४५ हजारलोकांपैकी साधारण एक तृतीयांश लोक शाकाहारी जेवण घेत असल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या ११ ते १२ वर्षात जवळजवळ एक हजाराहून अधिक लोकांना हृद्यरोगामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागल. ज्यातील १६९ लोकांचा हृद्याच्या झटक्याने मृत्यू झाला.

दरम्यान, संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की, मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत शाकाहारी व्यक्तींना हृद्यरोग होण्याचे प्रमाण ३२ टक्के कमी असते. त्याच अनुषंगाने अतिवजन असणा-या शाकाहारी व्यक्तींनाही हृद्यरोग होण्याचे प्रमाण २८ टक्के कमी असते. शाकाहारी जेवण घेण्याने हृद्यरोगाचा धोका कमी संभवतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.