मुंबई: काही फळ प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यदायीच असतात. यात सुकामेवा, फळ असलेल्या बदामाचं महत्त्व खूप आहे. उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत बदामाचं महत्त्व तितकंच आहे.
बदाम बी कच्ची असो किंवा पिकलेली ते खाणं आरोग्यदायीच. बदाम पौष्टिक आणि स्वास्थवर्धक मानलं जाते.
बदामात वसा, प्रोटीन आणि विविध प्रकारांचे व्हिटॅमिन आणि खनिज असतात. जे त्याला चॉकलेट, केक आणि बिस्किटासारखे खाण्यास योग्य बनवतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वस्थ राहतात. सालासकट बदाम खाणं योग्य, पण त्याची मात्रा संतुलित ठेवायला हवी. क्षमतेपेक्षा जास्त बदाम खाल्ल्यानं नेहमीच पचेल असं नाही, त्यामुळं पोट खराबही होऊ शकतं.
बदाम खाल्यानं कोलेस्ट्रॉल आणि सूज कमी होते. अंकुरीत बदाम भिजवून खाल्लेल्या बदामा पेक्षा जास्त आरोग्यदायी असते. बदाम महिलांच्या स्तनामध्ये दुग्ध वृद्धी करते. बद्धकोष्ठता आणि आतड्यांमधील दुखणं कमी करण्यासाठी बदाम आणि अंजीर एकत्र खावे. बदाम कफासोबत येणारं रक्त बंद करते.
बदाम कोणत्याही पदार्थामध्ये टाकल्यानं त्याच्या चवीत खूप वाढ होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.