नवी दिल्ली: योग म्हणजे एक पूर्ण विज्ञान मानलं जात आहे. ज्यातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो.
जर ताण-तणावामुळे सेक्ससंबंधी आपली इच्छा कमी होत असेल. शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा ते सुख आपण मिळवू शकत नसाल तर योगामधील हे खास आसन आपली समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात.
वैवाहिक आयुष्यात आनंदी होण्यासाठी योगातील हे खास आसन
1. पद्मासन: योगातील या आसनामुळं स्नायू, पोट, मूत्राशय आणि गुडघ्यामध्ये ताण उत्पन्न होतो ज्यामुळं ते मजबुत होतात. यामुळं शरीरात केवळ उत्तेजनाच नाही तर अंतिम क्षणाच्या आनंदातही वाढ होते. यामुळं आपण खूप वेळेपर्यंत सेक्स करू शकतो. आपली काम उत्तेजना या आसनामुळे परत येते.
2. हलासन: लैंगिक ऊर्जा वाढविण्यासाठी या आसनाचा वापर केला जावू शकतो. पुरूष आणि महिला दोघांचेही लैंगिक अवयव मजबूत आणि सक्रीय करण्याचं काम हे आसन करतं. यामुळं लैंगिक अवयवांमध्ये उत्तेजनेचा संचार होतो ज्यामुळं कामेच्छा जागृत होते. जर कुणामध्ये नपुंसकता असेल तर या आसनामुळे ही समस्या हळुहळू दूर होऊ शकते.
3. बटरफ्लाय आसन: या आसनामुळे लैंगिक अवयव सुदृढ होण्यासोबतच पेल्विक (pelvic) आणि ग्रॉइन (groin) अंगांमध्ये लवचिकता निर्माण होते. या आसनामुळे कामेच्छा वाढते आणि तो आनंद उपभोगता येता.
4. हनुमानासन: या आसनामुळं गुप्तांगामध्ये रक्ताचा संचार खूप चांगल्या पद्धतीनं होतो. सोबतच खालील अंगाच्या स्नायूंमध्ये ताण कमी असल्यामुळं लवचिकता येते. ज्यामुळं सेक्स दरम्यानचा त्रास कमी होतो.
5. उष्ट्रासन: या आसनामुळे गुप्तांगामध्ये रक्तसंचार चांगला होतो. सेक्सदरम्यान शरीरात खूप ऊर्जा निर्माण होते त्यामुळेच त्याचा आनंद उपभोगता येतो.
6. सर्वांगासन: जेव्हा कुणाची कामेच्छा अगदी मरून जाते. तेव्हा हे आसन त्यावर रामबाण उपाय ठरू शकतं. ज्यांना सेक्सच्या नावानेच नैराश्य येतं आणि सेक्स दरम्यान कमजोरी वाटते. हे आसन केल्यानंतर ती समस्या दूर होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.