तांब्याच्या भांड्यातले हे पदार्थ करतात विषाचं काम!

तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल... परंतु, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Nov 15, 2018, 01:12 AM IST
तांब्याच्या भांड्यातले हे पदार्थ करतात विषाचं काम!  title=

मुंबई : तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल... परंतु, तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

हे कोणते पदार्थ आहेत जे तांब्याच्या भांड्यात ठेवल्यानंतर खाल्यास आरोग्याला अपाय होतो, पाहा...

१. दही

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरतं. यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंगही होऊ शकतं.

२. लिंबू

लिंबूचा रस, लिंबू पाणी किंवा कापलेलं लिंबू तांब्याच्या भांड्यात ठेवू नका. लिंबात असलेलं अॅसिड तांब्यासोबत ठेवल्यास या दोघांमध्ये प्रक्रिया होऊन हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.

३. व्हिनेगर

व्हिनेगर हादेखील एक आम्लीय पदार्थ आहे. हा पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यामुळे निर्माण होणारी रासायनिक क्रिया तुमच्या आरोग्यावर परिणाम करते.

४. लोणचं

आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचंदेखील तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातून निर्माण होणारी क्रिया या पदार्थांना विष बनवते. अर्थातच हे पदार्थ खाणं शरीरासाठी योग्य नाही.

५. ताक

ताकामध्ये असलेल्या आंबट गुणधर्मामुळे ते तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते शरीरासाठी हानिकारक ठरतं. त्यापेक्षा मटक्यात ठेवलेल्या ताकाची चव नक्की चाखा...