हार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे

हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.  

Updated: Jun 16, 2016, 03:39 PM IST
हार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे title=

मुंबई : हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.  

हार्टअटॅक येण्यापूर्वीची लक्षणे :

१. छाती जड होणे किंवा जळजळ : हार्टअटॅक येण्याआधी छातीत असहज वाटणं याला दुर्लक्ष करु नका. शिवाय छातीत जळजळ होणे हे देखील हार्टअटॅक येण्याआधीचे संकेत असू शकतात.
 
२. थकवा : मेहनतीचं काम करतांना दम लागणे, थकवा जाणवणे हे देखील हार्टअटॅक येण्याआधीच्या सूचना असू शकतात. जेव्हा हृदयाशी जोडलेल्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं त्यामुळे तो हृद्याला रक्त पुरवठा करतांना अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृद्यावर ताण पडतो आणि तो अधिक जोराने काम करु लागतो. व्यवस्थित झोप घेतल्यानंतरही थकवा हे देखील हार्टअटॅक येण्याआधीचे संकेत आहेत.

 ३. सूज : जेव्हा हृद्याला शरिराच्या संपूर्ण भागाला रक्त पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. तेव्हा धमन्या आणि शिरा फुगतात आणि त्याला सूज येते. पायाचे पंजे सूजने, ओठ निळे होणे हे त्याचे संकेत असतात. 

४. अधिक वेळ सर्दी असणं : अनेक काळापर्यंत सर्दी किंवा याच्याशी संबंधित लक्षणं ही हृद्य विकाराचा झटका येण्याआधीचे संकेत असू शकतात. हद्य,  शरीरच्या आतील भागात रक्तसंचारासाठी जास्त मेहनत घेतो. तेव्हा फुफ्फुसमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते.

५. चक्कर येणे : जेव्हा तुमचं हद्य कमजोर होतं तेव्हा रक्तपुरवठा हा मर्यादित होतो. अशा वेळेस मेंदुपर्यंत ऑक्सिजन नाही पोहोचू शकत. ज्यामुळे चक्कर येणे, डोकं हलकं होणं अशा समस्या निर्माण होतात. हे एक हार्टअटॅक येण्याआधीच लक्षण असू शकतं. 

वरील लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. या समस्यांवर दुर्लक्ष करु नका.