मुंबई : कॅन्सरसारख्या भयानक आजारामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेलाय. लोकांमध्ये जागरुकता तसेच योग्य वेळी उपचार करुनही अनेकदा या आजारातून बाहेर पडणे शक्य होत नाही. मात्र कॅन्सरला अवघ्या काही मिनिटांत नष्ट करणाऱ्या फळाची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. यातून बाहेर पडणे खूपच कठीण असते. पण कॅन्सरची लक्षणे जाणवू लागल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाऊ शकते. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. आपल्या औषधामुळे कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असे अनेकजण दावा करतात. पण अद्यापही याला वैज्ञानिक जोड मिळाली नाही. असे असले तरीही यावर संशोधन सुरूच आहे. यासंदर्भातील मेसेज देखील व्हॉट्सएप, फेसबुकवर व्हायरल होत असतात. अनेकांना तो मेसेज खरा देखील वाटतो. त्यानंतर काहीही मागेपुढे विचार न करता ते मेसेज तसेच पुढे फॉरवर्ड केले जातात. यासाठी ते मेसेज कशाप्रकारचे असतात याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. कोणत्याही मेसेजमध्ये तथ्य नसेल तर फॉरवर्ड करता कामा नये. डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यांचा या कामी सल्ला घ्यायला हवा. असाच एका फळाचा मेसेज देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हे फळं अवघ्या काही मिनिटांत कॅन्सरचा इलाज करते असा संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहे. हे फळ कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर हे फळ परिणामकारक असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय असेही यामध्ये म्हटले आहे.
कॅन्सरवरील इलाजासाठी बनवण्यात येणाऱ्या औषधात ज्याचा वापर होतो त्याची मात्र फळांच्या बियांमध्ये अधिक असल्याचे आढळून आले आहे. उत्तर ऑस्ट्रेलियातील जंगलात या फळाचे झाड आढळल्याचा संदेश वेगाने फिरू लागला आहे. याचा शोधही योगायोगाने लागला. ऑस्ट्रेलियातील जंगलात एका वेगळ्या शोधासाठी गेलेल्या वैज्ञानिकांना ऑस्ट्रेलियन ब्लशवूड नावाच्या झाडावर काही फळे दिसली. जंगली प्राणी ही फळे खाऊन त्याच्या बिया थुकून टाकतात. हे पाहून वैज्ञानिकांनी या बियांची तपासणी केली. या तपासणीत कॅन्सरवर प्रभावी तत्व या बियांमध्ये असल्याचे आढळल्याचे यामध्ये म्हटले आहे.