काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे

तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.

Updated: Aug 9, 2016, 04:44 PM IST
काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे title=

मुंबई : तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.

काळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे :

१. लठ्ठपणा : अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

२. हृदय : हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

३. पचन: काळे तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.

४. रोगप्रतिकार शक्ती : काळे तांदुळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
 
५. अँटीऑक्सीडेंट :
हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.