नवी दिल्ली : माणूस एक वेळ खाण्याशिवाय जिवंत राहू शकतो मात्र पाण्याशिवाय राहणे अशक्य आहे. म्हणूनच तर त्याला जीवन म्हणतात. मात्र हे पाणी पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात जायला हवे. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास शरीरावर मोठा परिणाम होतो.
पाणी किती प्रमाणात पिणे गरजेचे असते याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. युरिन आणि घामाद्वारे आपल्या शरीरातील पाणी बाहेर उत्सर्जित होते. त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल कायम राखण्यासाठी स्वच्छ आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते.
तुम्ही जर पाणी कमी पित असाल तर या आठ समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल.
पाणी कमी पिण्यामुळे वाढत्या वयाच्या खुणा लवकर दिसू लागतात. सुरकुत्या लवकर येतात. त्वचेची चमक निघून जाते आणि ती सैल पडू लागते
डिहायड्रेशनच्या स्थितीमध्ये मेंदू भूक लागल्याचे संकेत देतो. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेटाबॉलिजमची प्रक्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट जमण्यास सुरुवात होते.
मांसपेशीसाठी पाणी गरजेचे असते.
पाण्यातून त्वचेला मॉश्चरायझर मिळत असते. पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहते. मात्र कमी पाण्यामुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो.
कमी पाणी पिण्यामुळेही हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो
कमी पाणी पिण्यामुळे डोळेही शुष्क होतात. जर तुम्ही चश्माऐवजी लेन्सचा वापर करत आहात तर योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.
कमी पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. दात तसेच जीभेच्याही अनेक समस्यांचे कारण कमी पाणी असू शकते.
कमी पाणी पिणाऱ्यांना चक्करचा त्रास अधिक जाणवतो. याशिवाय थकवाही अधिक जाणवतो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.