`काँग्रेसचा हात` उंचच उंच... आघाडीवर

कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे.

Updated: May 8, 2013, 10:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटकचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता लागलीये. येडियुरप्पांच्या बंडानंतर भाजपचं पहिलं वहिलं दक्षिणेकडचं राज्य हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलेली आहे. तब्बल ९६ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
येडीयुरूप्पा यांच्या जाण्याने भाजपला फटका बसणार असला तरीसुद्धा काँग्रेस मात्र याचा नक्कीच फायदा उचलणार आहे. थोड्याच वेळात हे सारं चित्र स्पष्ट होईल. तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात महाराष्ट्र एकीकरण समिती नव्या जोशात उतरली आहे...
बेळगाव महापालिकेतल्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी एकीकरण समितीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि जनता सज्ज झाली आहे. मात्र विधानसभेत यश मिळाल्यावर महाराष्ट्राच्या नेत्यांकडून या जनतेनं काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.