गुजरातमध्ये भाजप ११४ जागांवर आघाडीवर

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली आहे. भाजप ११४ तर काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2012, 11:29 AM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली आहे. सकाळी साडे ११ पर्यंत भाजप ११४ तर काँग्रेस ६४ जागांवर पुढे होती. त्यामुळे पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला २/3 असे स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा दावा माजी गृहराज्य मंत्री आणि नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शाह यांनी केला आहे. त्यामुळे याला भाजपच्या आघाडीमुळे दुजोरा मिळत आहे. बहुमताचा ९२ हा जादुई आकडा भाजपने पार केला आहे.

सकाळी ९.२० वाजता गुजरातमध्ये १०० जागांचे निकाल हाती आले त्यावेळी काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर तर भाजप ६७ जागांवर आघाडीवर होता. तर लक्षवेधी असलेल्या मणिनगरमधून नरेंद्र मोदी ८००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर विसावदरमधून केशूभाई पटेल आघाडीवर दिसून येत आहेत. तसेच नारणपुरामधून अमित शहा यांनी जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे.