सट्टेबाजारात `मोदी मंत्रिमंडळ` जोरात!

नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 20, 2014, 03:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सट्टेबाजांमध्येही याच बाबतीत जोरदार देवाण-घेवाण सुरू आहे. सट्टेबाजारात गृह, वित्त, सुरक्षा आणि परदेश मंत्रालयाबद्दल खूपच उत्सुकता दिसून येतेय.
राजकीय विश्लेषक आणि सट्टेबाजार यांचे याबाबतीत मात्र विचार जुळून येत असल्याचं यानिमित्तानं दिसून येतंय. सट्टेबाजारात सट्टा लावताना पैजेबद्दल जेव्हढी जास्त सुरक्षितता तेवढाच त्यापासून मिळणारा फायदा कमी असल्याचं दिसतंय.
वित्त मंत्रालयासाठी जेटलींचा भाव वधारला
सट्टाबाजारातील भावांवर नजर टाकल्यास वित्त मंत्रालयाच्या शर्यतीत अरुण जेटली आणि अरुण शौरी सर्वांत पुढे आहे. जेटली यांच्यावर 20 पैशांचा भाव आहे तर शौरी यांच्यावर 25 पैशांचा... या पद्धतीनं पाहिलं तर जेटली यांच्यावर सट्टा लावणं सट्टेबाजांसाठी जास्त सुरक्षित मानलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, जेटली अमृतसरमध्ये निवडणुकीत हरल्यानंतरही सट्टेबाजांमध्ये त्यांना एवढा भाव मिळतोय.
राजनाथ यांच्यावर गृहमंत्रालयाची जबाबदारी?
राजनाथ सिंह यांना गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जातेय. राजनाथ यांच्यावर गृहमंत्रालयासाठी 15 पैशांचा भाव लावण्यात आलाय. तर माजी सेनाअध्यक्ष जनरल व्ही. के. सिंह यांना गृह मंत्रालय मिळण्याच्या शक्यतेवर चौपट फायद्याची ऑफर दिली जातेय. जनरल सिंह यांच्यावर 60 पैशांचा भाव सुरू आहे. नितीन गडकरी याहून थोडे मागे आहेत. गडकरींवर गृहमंत्रालयासाठी 50 पैशांचा भाव लावण्यात येतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.