www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारं एनडीए सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे लवकरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांना मिळणाऱ्या सगळ्या सोई-सवलती आता काढून येण्याची चिन्ह दिसत आहेत.
सोनिया गांधी सत्तेत असताना त्यांच्या जावयानं ज्या सोई-सुविधांचा बिनविरोध उपभोग घेतला त्या सगळ्या सोई-सुविधा आता त्यांच्यापासून दूर होणार आहेत... याची सुरुवात होतेय ती रॉबर्ट वडेरा यांना विमानतळावर मिळणाऱ्या खास वागणुकीपासून...
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर चौकशीपासून रोखल्या गेलेल्या काही खास प्रवाशांच्या यादीतून रॉबर्ट वडेरा यांचं नाव काढून टाकण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या यादीत वडेरा यांच्या नावाचा समावेश असल्यानं विमानतळावर त्यांना कुणीही हटकत नव्हतं.
गंमतीशीर गोष्ट म्हणजे, प्रियांका गांधी याचा पती आणि सोनियांचा जावई म्हणून रॉबर्ट वडेरा हे एकमेव सामान्य नागरिक आहेत, ज्यांची विमानतळावर चौकशी होत नाही.
विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एक नॉन प्रॉफिट बॉडी बनवून भारतीय विमानतळांवर रॉबर्ट वडेरांना मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटला आक्षेप घेतला होता. याबद्दल ‘एअर पॅसेंजन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी नागरिक उड्डान सचिव अशोक लवासा यांनादेखील पत्र पाठवलं होतं. रॉबर्ट वडेरा यांना यांसारख्या अजून कोणकोणत्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी हे प्रवासी उत्सुक आहेत.
राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ न्यायाधीशांना विमानतळावर ही सुविधा मिळण्याचे अधिकार लागू आहेत. पण, सोनियांच्या आशिर्वादानं वडेरा आत्तापर्यंत यांसारख्या अनेक सुविधा बिनबोभाटपणे उपभोगत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.