`नमो नमो`चा जप नको, सरसंघचालकांचे आदेश

भाजपमध्ये सुरु असलेला `नमो नमो`चा जप संघाला मान्य नसल्याची चर्चा सुरु झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ नमो नमोचा जप करु नये, असा स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्याचं समजतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 11, 2014, 11:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपमध्ये सुरु असलेला `नमो नमो`चा जप संघाला मान्य नसल्याची चर्चा सुरु झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ नमो नमोचा जप करु नये, असा स्पष्ट आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्याचं समजतं.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोवतीच सध्या प्रचारमोहिम फिरते आहे. एक प्रकारे भाजपचे कार्यकर्ते नमो नमोचा जप करत आहेत त्यालाच आरएसएसनं आक्षेप घेतलाय. एखाद्या व्यक्तीचा उदोउदो करणाऱ्या प्रचारापासून दूर रहावे आणि मर्यादांचे उल्लंघन करु नये असा आदेशच भागवत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
रविवारी बंगळुरूत आरएसएसच्या झालेल्या प्रतिनिधी सभेला संबोधित करतांना मोहना भागवत यांनी स्वयंसेवकांना हे आदेश दिलेत. ते म्हणाले,"आपण राजकारणात नाही आहोत. आपलं काम नमो नमो करणं नाही. आपण आपल्या ध्येयासाठी काम करायला हवं."

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.