राहुल गांधींचे `हनीमून` दलितांच्या घरी - बाबा रामदेव

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे `पिकनिक आणि हनीमून` करण्यासाठी दलितांच्या घरी जातात

Updated: Apr 26, 2014, 12:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे `पिकनिक आणि हनीमून` करण्यासाठी दलितांच्या घरी जातात, असे खळबळजनक वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. लखनऊच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी `फकीर` आहेत. या उलट राहुल गांधी यांना आपल्या लग्नासाठी एक मुलगी देखील शोधता आलेली नाही. यावेळी त्यांनी सोनिया गांधींवर देखील तोंडसुख घेतलं.
सोनिया गांधी यांच्याबाबत रामदेव म्हणालेत, सोनियाला राहुलसाठी परदेशी सून पाहिजे. पण परदेशी सून केली तर राहुलला पंतप्रधान होताना अडचण निर्माण होईल. या कारणाने आधी राहुलला पंतप्रधान होऊ दे, मग त्यांच्या परदेशातील मुलीसोबत लग्नाचा विचार करु असं सोनियांना वाटत.
राहुलनी जर भारतीय मुलीसोबत लग्न केलं असतं, तर राहुल पंतप्रधान देखील झाले असते. राहुलल पिकनिक अणि हनीमूनसाठी दलितांच्या घरात जातात. पण राहुलने जर एका खास समाजातील मुलीसोबत लग्न केलं असतं. तर त्या समाजाचा विकास झाला असता, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.