www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचा विजय निश्चित असून भाजपच विजयी होईल असा विश्वात भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केलाय. वाराणसीत मतदान केल्यानंतर ते बोलत होते.
वाराणसीतून यापूर्वी भाजपकडू मुरली मनोहर जोशी यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मोदींसाठी त्यांना ही सीट सोडावी लागली आणि कानपूरमधून त्यांना निवडणूक लढवावी लागली आहे.
भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी महिला आणि तरूण मतदारांचे आभार मानलेत. तसंच मतदानादरम्यान केवळ राज्य पोलिसांवर विसंबून न राहता सेंट्रल सिक्युरिटी फोर्सचीही मदत घ्यावी, अशी सूचना मोदींनी इलेक्शन कमिशनला केली.
काँग्रेसचे वाराणसीमधील उमेदवार अजय राय हे शर्टवर पत्रचिन्ह लावल्यामुळे चांगलेच अडचणीत आलेत. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर करण्याचे आदेश वाराणसी रिटर्निंग ऑफिरला दिले आहेत. शर्टवर पक्षचिन्ह लावलण्याप्रकरणी भाजप यांनी अजय राय यांची तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.
वाराणसीमध्ये हाय प्रोफाईल लढत रंगेतय. मात्र, यासाठी मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना वोटर आयडी असूनही मतदान करता आलेलं नाही. यामुळे मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणात संताप दिसून येतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल जोशी यांनी.
पश्चिम बंगालच्या हरोआमध्ये आज मतदानाच्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. तृणमूलच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हाणामारीमध्ये 16 जण जखमी झाले असून चार जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये दहशत पसरवत आहे. मात्र निवडणूक आयोगाचं लक्ष मात्र देशातल्या एकाच निवडणूक क्षेत्रावर असल्याची टीका सीताराम येचुरी यांनी केलीय. आज उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो लॅपटॉपवर लावला होता. त्याला भाजपनं आक्षेप घेतला आहे. आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. त्यावर आयोगानं कारवाईतचं आश्वासन दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.