...असा असेल मोदींचा ‘निकाला’चा दिवस!

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी भाजप आणि मोदींचे समर्थक उद्या जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत. मोदींचे जन्मस्थळ असलेल्या वडनगरमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2014, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी भाजप आणि मोदींचे समर्थक उद्या जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत. मोदींचे जन्मस्थळ असलेल्या वडनगरमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलीय.

नरेंद्र मोदींचा नेमका काय कार्यक्रम आहे पाहूयात...
16 मे - दुपारी चार वाजता बडोद्यामध्ये जाणार
16 मे - संध्या. 7 वाजता अहमदाबादमध्ये रॅली
17 मे - सकाळी 10 वाजता दिल्लीला जाणार
17 मे - दुपारी संसदीय बोर्डाची बैठक
17 मे - संध्याकाळी वाराणसीमध्ये पोहोचणार
17 मे - संध्याकाळी वाराणसीत गंगा आरतीचा कार्यक्रम
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा भाऊ प्रल्हाद मोदी हेदेखील आता मोदी पंतप्रधान होणार या आशयाच्या बातम्यांनी आनंदी झालेत. ‘नरेंद्र मोदी हे राष्ट्रसमर्पित पुरुष आहे. त्यांच्या या कर्तबगारीमुळे अवघा मोदी परीवार आनंदून गेलाय. सामान्य घरातला मुलगा ते पंतप्रधानपदाच्या पदापर्यत पोहोच ही गोष्ट अविस्मरणीय अशीच आहे’ अशीच प्रतिक्रिया प्रल्हाद मोदी यांनी व्यक्त केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.