www.24taas.com, झी मीडिया, हाजारीबाग
आगामी लोकसभेत काँग्रेसचे खासदार शोधण्यासाठी कॅमेरे लावावे लागतील, असा टोला एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लगावलाय. झारखंडमधल्या हाजारीबागमधल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एका प्रख्यात एजन्सीनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
मोदी यांनी संजय बारु यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावरुनही पुन्हा एकदा सरकार आणि सोनिया गांधी यांना लक्ष्य केलं. हाजारीबाग मतदारसंघातून ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा निवडणूक लढवतायत. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एका प्रख्यात एजन्सीनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय. 543 जागांपैकी एनडीएला 275 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेहून 16 जागा अधिक मिळणार असल्याचं या ओपिनियन पोलमधून समोर येतंय.त्यामध्ये भाजप 226 जागा जिंकत सर्वात मोठा विजयी पक्ष बनू शकतो.
991 नंतर पहिल्यांदाच एखादा पक्ष एवढ्या जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त होतोय.युपीएला केवळ 111 जागा जिंकता येतील असं हा ओपिनियन पोल सांगतो. तर त्यामध्ये काँग्रेसला आत्तापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे केवळ 92 जागा मिळतील असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.