www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अहमदनगर आणि मुंबईत काही ठिकाणी फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं राज्यात काही ठिकाणी फेरमतदानाचे आदेश दिले आहेत. मतदानापूर्वी घेण्यात येणा-या मॉक वोटींगची मतं EVM मशिनमधून न उडवल्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येणार आहे.
27 एप्रिल म्हणजेच उद्या सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फेरमतदानाची वेळ देण्यात आलीये. उत्तर मुंबई चारकोप बुथ - 243, मालाड प. बुथ 242, उत्तर मध्य मुंबईतील कांदिवली 160 तर अहमदनगर श्रीगोंडा बुथ 305 या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी दाखविण्यात आलेल्या डेमोतील मते धरली गेलीत. त्यामुळे मतदानात वाढ झाल्याचे लक्षात आले. हा घोळ टाळण्यासाठी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.