मनसेला पहिल्यांदाच मिळणार २ नवे मित्रपक्ष

शेकापचे जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Updated: Mar 6, 2014, 02:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शेकापचे जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाती मानली जातेय.
दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसेला मागील निवडणुकीत चांगल यश मिळालं असलं तरी, मनसेला अजून कोणताही मित्र पक्ष मिळालेला नाही. यामुळे शेकाप सारखा पक्ष मनसेला मिळाला, तर लोकसभेसह राज्यातील समीकरणंही बदलणार आहेत, कोकणात याचा प्रभाव दिसून येईल, असं सांगण्यात येतंय.
नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे तसेच जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी ही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विनय कोरे हे मनसेच्या जवळ आले तर पश्चिम महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांच्यात यापूर्वी मुंबईत चर्चा झाली होती, यानंतर मनसे महायुतीत येणार असल्याची भाकित केली जात होती.
मात्र शिवसेनेने असं होणार नसल्याचं सांगितलं होतं, तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.