‘मी राजीव गांधींची मुलगी’, प्रियांकाचा मोदींना तडाखा

‘मी राजीव गांधींची मुलगी आहे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शाब्दिक तडाखा दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 1, 2014, 05:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘मी राजीव गांधींची मुलगी आहे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रियांका गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शाब्दिक तडाखा दिलाय.
त्याचं झालं असं की, दूरदर्शनच्या एका मुलाखतीत नरेंद्र मोदींनी ‘प्रियांका मला मुलीसारखी आहे’ असं म्हटलं होतं. पण, त्यानंतर मात्री मोदींनी प्रियांका गांधी यांना बेटी संबोधल्यावरुन सुरू झालं राजकारण... दूरदर्शननं मोदींच्या मुलाखतीच्या प्रसारणावेळी प्रियांका गांधीबाबतचा हा उल्लेख वगळला.
परंतु, नरेंद्र मोदींचं प्रियांकाबद्दलचं हे वाक्य काँग्रेसपर्यंत पोहचताच केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी यावर आपल्या स्टाईलमध्ये टीका केली. ‘मला आनंद आहे की मोदी प्रियांका गांधींना त्यांच्या मुलीप्रमाणे समजतात, पण प्रियांका मोदींना आपल्या वडिलांच्या जागेवर पाहू शकतात का याबद्दल मात्र मला शंका आहे’ असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं. त्यानंतर प्रियांका गांधी यांचं हे उत्तर आलंय.
प्रियांका गांधी यांनी याबद्दल उत्तर देताना नरेंद्र मोदींवर काहीही बोलणं पसंत केलं नाही परंतु, ‘मी राजीव गांधी यांची मुलगी आहे’ असं प्रत्युत्तर दिलंय.
दरम्यान, भाजपनं पी. चिदंबरम यांना भारतीय संस्कृती कदाचित माहित नसेल, असं म्हणत पलटवार केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.