शिवसेना नेते रामदास कदमांविरोधात FIR
सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
Apr 23, 2014, 06:01 PM ISTरामदास कदमांच्या `त्या` वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण
महायुतीच्या कालच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 6 महिन्यांत पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, असं कदम म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानापासून स्वतःला आणि पक्षाला वेगळं काढलंय. हे विधान बाळासाहेबांच्या भूमिकेशीही विसंगत असल्याचं ठाकरे म्हणालेत.
Apr 22, 2014, 08:44 PM IST