दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 27, 2014, 06:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.
लोकसभा निवडणुका ज्यांच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या गेल्या, ते गोपीनाथ मुंडे आता मोदी सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री झालेत तर गडकरींनी आधीपासूनच राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवली जाण्याची शक्यता आहे.
`दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र` असं सूत्र भाजपनं आखलं असल्याचं समजतंय. 'ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री...' या ठरलेल्या सूत्राला तिलांजली देत भाजपनं शिवसेनेवर कुरघोडी करायला राज्यात निवडणुका जाहीर होण्याआधीच सुरुवात केलीय.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्राची धुरादेखील अमित शहा यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता आहे. अमित शहा महाराष्ट्राचे प्रभारी झाल्यास तेच निवडणुकीचे सर्वेसर्वा असतील, असंही बोललं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.