सेलिब्रेटी उमेदवार: किरण खेर, परेश रावल विजयी

लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 16, 2014, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक 2014मध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशीब निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केलाय. त्यात काहींना यश तर काहींना अपयश पाहावं लागतंय. कोण-कोणते सेलिब्रेटी विजयी झाले आणि कोणते पराभवाच्या छायेत आहे ते पाहूया...
परेश रावल (भाजप)
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे अहमदाबादमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करत अभिनते परेश रावल विजयी झाले आहेत.
स्टेटस - विजयी
किरण खेर (भाजप)
बॉलिवूडमध्ये आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री किरण खेर यांनी लोकसभा निवडणूकही गाजवलीय. काँग्रेसच्या पवनकुमार बंसल आणि आपच्या गुल पनागला हरवत चंदीगढमधून त्या विजयी झाल्या आहेत.
स्टेटस - विजयी
राज बब्बर (काँग्रेस)
अभिनेते राज बब्बर गाझियाबादमधून काँग्रेसच्या तिकीटावर उभे आहेत.
स्टेटस - पराभूत
स्मृती इराणी (भाजप)
छोट्या पदद्यावरची तुलसी आणि नरेंद्र मोदींनी जिला आपली बहिण म्हटलं अशी अमेठीची उमेदवार अभिनेत्री स्मृती इराणी. स्मृती इराणी या राहुल गांधींना चांगलीच टक्कर देत आहेत.
स्टेटस - पराभूत
हेमा मालिनी (भाजप)
ड्रीमगर्ल हेमा मालिनी मथुरामधून निवडणूक लढवतायेत.
स्टेटस - विजयी
विनोद खन्ना (भाजप)
2009मध्ये पराभूत झाल्यानंतरही अभिनेते विनोद खन्ना यांना गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी दिलीय.
स्टेटस - आघाडीवर
गुल पनाग (आप)
अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पक्षाकडून चंदीगढ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र अभिनेत्री किरण खेरनं तिला पराभूत केलंय.
स्टेटस - पराभूत
शत्रुघ्न सिन्हा (भाजप)
भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यंदा पटना साहिब मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
स्टेटस - आघाडीवर
राखी सावंत (अपक्ष)
आयटम गर्ल राखी सावंत सध्या वेगळ्या अवतारात दिसतेय. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून ती निवडणूक लढवतेय.
स्टेटस - पराभूत
कमाल खान (समाजवादी पक्ष)
नेहमीच वादात असलेला सेलिब्रेटी म्हणजे कमाल खान अर्थात केआरके. समाजवादी पक्षातकडून उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तो निवडणूक लढवतोय. राखी सावंतच्या विरोधात...
स्टेटस - पराभूत
मनोज तिवारी (भाजप)
भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी भाजपकडून उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवतोय.
स्टेटस - आघाडीवर
रवि किशन शुक्ला (काँग्रेस)
भोजपुरी चित्रपटांमधलं आणखी एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे रवि किशन. त्यानं अनेक हिंदी चित्रपटांमध्येही खूप काम केलंय. जौनपूर मतदारसंघातून तो आपलं नशीब आजमावतोय.
स्टेटस - पराभूत
प्रकाश झा (जनता दल यूनायटेड)
चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा बिहारच्या बेत्तीह मतदारसंघातून जनता दल यूनायटेडकडून निवडणूक रिंगणात आहेत.
स्टेटस - पराभूर
महेश मांजरेकर (मनसे)
अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
स्टेटस - पराभूत
नगमा (काँग्रेस)
सुंदर दाक्षिणात्य अभिनेत्री नगमा काँग्रेसची मेरठची उमेदवार आहे.
स्टेटस - पराभूत
बप्पी लाहिरी (भाजप)
ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी कोलकाताच्या हुगळीच्या श्रीरामपूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत.
स्टेटस - पराभूत
बाबुल सुप्रियो (भाजप)
भाजपकडून बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालच्या असानसोल जिल्ह्यातून निवडणूक रिंगणात आहेत.
स्टेटस - आघाडीवर
मुनमुन सेन (तृणमुल काँग्रेस)
बंगाली ब्युटी अभिनेत्री मुनमुन सेन पश्चिम बंगालच्या बंकुरा मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत.
स्टेटस - आघाडीवर
विश्वजित चॅटर्जी (तृणमुल काँग्रेस)
तृणमुल काँग्रेसकडून ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चॅटर्जी निवडणूक रिंगणात आहेत.
स्टेटस - पराभूत

*