www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपनं रायबरेलीतून सुप्रीम कोर्टाचे वकील अजय अग्रवाल यांना सोनिया गांधीच्या विरोधात मैदान उतरवलंय. त्यामुळे रायबरेली मतदार संघात सोनिया गांधी विरुध्द अजय अग्रवाल सामना रंगणार आहे. तर अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिलीय.
राहुल गांधीसमोर भाजपच्या स्मृती इराणी कशी लढत देतात याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत स्मृति इराणी आणि अग्रवाल यांना उमेदवार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि अरूण जेटली उपस्थित होते. पक्षानं बांदा लोकसभा मतदार संघातून भैरव प्रसाद मिश्र यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय.
उमेदवारी मिळाल्यानंतर स्मृति इराणीनं म्हटलं, " गांधी कुटुंबाच्या नावानं अनेक वर्षांपासून अमेठीतील जनता विकासापासून वंचित राहिलेली आहे. मला वाटतं हे खूप लाजीरवाणं आहे." देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मोठा बदल घडेल, असं इराणी म्हणाल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.