मनसेचा आठवा वर्धापनदिन सोहळा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2014, 01:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम सध्या सुरु आहे...

LIVE : मनसे वर्धापनदिन
* नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला हवेत - राज
* मनसे खासदार नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार - राज
* लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा - राज
* पुढची यादी येत्या दोन-तीन दिवसांत
* पहिली यादी जाहीर करत आहे - राज ठाकरे
* आपली ताकद दाखवून देणार - राज
* निवडणूक लढवणार - राज ठाकरे
* गारपीटीमुळे आजचा मनोरंजक कार्यक्रम रद्द - राज
* एकनाथ खडसेंच्या मागण्यांना पाठिंबा - राज ठाकरे
* मनसेच्या मोबाईल अॅपचं उद्घाटन
* राकेश मारियांच्या बाबतीत दुटप्पीपणा
* निवडणूक आयोग अधिकारांचं उल्लंघन करतंय
* संजय राऊत यांचा पोपट म्हणून उल्लेख
* शिवसेनेचं नेतृत्व विकाऊ झालंय
* राज ठाकरे कुणालाही भेटायला गेले नाहीत - शिंदे
* राज ठाकरेंना अनेक जण भेटायला आले - शिंदे
* स्टँम्प ड्युटीसाठी महाराष्ट्राला पहिला नंबर
* दारुच्या महसुलीसाठी महाराष्ट्राला पहिला नंबर
* दारु उत्पादनासाठी महाराष्ट्राला पहिला नंबर
* झोपडपट्टयांसाठी महाराष्ट्राला पहिला नंबर
* शुभ दिनी चांगले लोक मनसेत येतात - नांदगावकर
* ये तो अभी झाँकी है - नांदगावकर
* अभिजीत पानसे, सुनील धांडे मनसेत
* उद्धव ठाकरेंनी धूतकडून बांधला गंडा - शिंदे
* राजकुमार धूतकडून २५ कोटींचा गंडा - शिशिर शिंदे
* शिशिर शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर नाव घेऊन टीका
* मुंबई : अभिजीत पानसेंचा मनसेत प्रवेश

नितीन गडकरींनी मनसेला लोकसभा निवडणुक न लढवण्याचं केलेले आवाहन, मनसेला महायुतीत घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न आणि शिवसेनेने त्याला केलेला विरोध तसेच तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न या सर्व मुद्यांवर राज ठाकरे काय बोलणार याची मोठी उत्सुकता राजतीय वर्तुळात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केले असून किमान १५ जागा लढवल्या जातील अशी चर्चा आहे. वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे उमेदवार जाहीर करणार का? याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.  

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.