साहित्य - १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड
कृती – मिक्सर मध्ये बदाम १/२ वाटी दूधासोबत बारिक वाटून त्याची पेस्ट तयार करावी. नंतर उरलेल्या दूधामध्ये साखर विरघळेपर्यत दूध गरम करावे. त्यानंतर गरम दूधामध्ये केशरच्या कांड्या, तांदूळ-बदामाची पेस्ट, तसेच वेलची पूड टाकावी. मिश्रण जाड होईपर्यत ते मंद आचेवर ढवळत राहावे.
फिरणी तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये आतून त्यावर बदाम-पिस्ताची खिसलेले किंवा कापलेले तुकडे टाकून सजावट करावी. आणि नंतर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यावी.