स्पॉट फिक्सिंग : विंदू, मयप्पनला जामीन मंजूर

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांना किला कोर्टाने जामीन मंजूर केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2013, 01:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांना किला कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मयप्पन आणि विंदू यांच्याबरोबर इतर आठ जणांनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. स्पॉट फिक्सिंग आणि सट्ट्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.
२५ हजारांच्या वैयक्तिक जात-मुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर करण्यात आलाय. आयपीएलच्या सामन्यांमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी विंदू दारा सिंग २१ मे पासून तर मयप्पन २५ मेपासून अटकेत होते. प्रेम तनेजा आणि अल्पेश पटेल यांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्याचबरोबर विंदू आणि गुरुनाथला देश सोडण्यास मनाई करण्यात आलीय. हे दोघेही एक दिवसाआड क्राईम ब्रांचमध्ये हजेरी लावणार आहेत. सध्या दोघेही मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये आहेत. जर जामिनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर आज संध्याकाळी ते बाहेर येथील.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलची टीम चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य अधिकारी मयप्पन हा अभिनेता विंदूच्या मदतीनं आयपीएल मॅचमध्ये सट्ट् लावत होते. विंदू आणि मयप्पन यांच्यादरम्यान झालेल्या संभाषणाची प्रतिलिपीही पोलिसांनी तयार केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.