www.24taas.com,झी मीडिया,सिलिगुडी
स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय. अशा प्रकारे जीवाशी खेळ का केला जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०००फूट उंचीवर मृत्यूचा खेळ !
हवेत जीवघेणा स्टंट !
टाळ्यांच्या कडकडाटात मृत्यूचा घाला !
पाहाता पाहाता गेला जीव !
स्टंटमनच्या जीवावर बेतला स्टंट !
स्टंटची दृश्य विचलित करु शकतात !
कारण हा आहे जीवघेणा स्टंट !
सिलिगुडीतील तीस्ता नदीवर असलेल्या रोप-वेवर जो थरार घडलाय त्याविषयी कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. खरंतर हजारो लोक तिथ तो स्टंट पाहाण्यासाठी जमा झाले होते. दोन हजार फूट उंचीवर स्टंट मॅन काळजाचा ठोका चूकवणारा स्टंट करणार होता.
डोक्या केसांच्या मदतीने तीस्ता नदी पार करण्या स्टंट मॅनचा इरादा होता..तीस्ता नदीवरच्या रोपवेची लांबी ६०० मीटर इतकी आहे. टाळ्यांचा कडकडाट आणि लोकांकडून मिळणारं प्रोत्सहान यामुळे तिथलं वातावरण काही वेगळचं होतं. जोशपूर्ण वातावरणात स्टंटमॅन शैलेंद्र पुढ पुढे सरकत होता. त्याने चाळीस टक्के अंतर पार केला होता. पण अचानकपणे सगळं चित्रच बदलून गेलं. तो स्टंट पाहाण्यासाठी आलेल्यांच्या आंगावर काटा उभा राहिला.
तो स्टंट मृत्यूचा बनला. रोपवे आणि केस यांच्यातील व्हील अचानकपणे रोपवेमध्ये अडकलं आणि ती दुर्घटना घडली. अनेक प्रयत्न करुनही स्टंटमॅनला ते अ़डकलेलं व्हील मोकळ करता आलं नाही. रोपवेवर स्टंट करतांना जीव गमावलेले शैलेंद्र नाथ राय हे पश्चिम बंगालमध्ये होमगार्ड होते. थरारक कारनामे करुन त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं.
४८ वर्षीय शैलेंद्र यांनी डोक्याच्या केसांच्या मदतीने वाहन ओढण्याचा विश्वविक्रम केला होता. एव्हडंच नव्हे तर चाळीस टन वजनी ट्रेन केसांच्या मदतीने ओढण्याचाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. पण सिलिगु़डीतील तो थरारक स्टंट त्यांच्या जीवावर बेतला.
स्टंट करतांना स्टंट मॅनचा मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही..पण असं असतानाही लोक स्टंट करण्यास मागेपुढे पहात नाहीत..सिलिगूडीतील स्टंट करतांना आवश्यक सुरक्षा उपाय केले गेले नसल्याचं उघड झालंय. यावरुन एकबाब स्पष्ट होते आणि ती म्हणजे स्टंट जीवघेणा ठरु शकतो.
थ्रील म्हणून काहीजण थेट मृत्यूलाच आव्हान देतात. त्यातून त्यांना भलेही क्षणीक आनंद मिळत असेल. पण जराजरी चूक झाली तर मृत्यू झालाच म्हणून समजा..असाच एक थरारक स्टंट आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.
आयुष्याशी बेफिकीरी करत, मृत्यूची तमा न बाळगता लोक स्टंट करत कुठल्या थराला जावू शकतात याची कल्पना देणारी ही दृष्य पाहिल्यानंतर तुम्हीही हादरुन जाल. मौज म्हणून लोक काय करु शकतात त्याची साक्ष देणारी ही चित्रफित आहे. ही चित्रफित बघीतल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही...काही दिवसांपूर्वी ही चित्रफित सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यात आली होती.
मानवी मन हे सगळ्यात जास्त गतिमान असलं तरी भौतिक वेगाला देह आव्हान देऊ शकत नाही हे वास्तव आहे. वेगवान येणा-या रेल्वेच्या समोरुन काय अगदी खेटून उभ राहण्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही.. पण थ्रीलची नशा भिनलेल्या काही तरुणांना यांची तमा नसते.. नीट पहा हे दृष्य.
रेल्वे्च्या रुळावर असलेला हा तरुण काय करतेय हा प्रश्न तुम्हालाही प़डला असेल. अचानक समोरुन वेगानं एक रेल्वे येते आणि मृत्यूची तमा नसलेला हा तरुण थेट रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देतो. काय होतय ते कळण्याच्या आत रेल्वे वेगाने निघून जातेय...तो तरुणी पुन्हा उठून उभा रहातो...आपण जगापेक्षा काही तरी वेगळ केल्याची भावना त्याच्या चेह-यावर उमटते.पण हा स्टंट जीवघेणा ठरु शकतो. एक चूक जीवावर बेतू शकते...असा स्टंट करण्याचा विचारही तुम्ही करु नका.
खरंतर स्टंट हा एक पेशा बनला आहे. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अवघड सीनसाठी स्टंटमॅनचा वापर केला जातो. पण ते स्टंट मॅ