मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचा आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
ओम पुरी बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी व्यवसायिक तसेच प्रायोगिक सिनेमांमध्ये त्यांनी यश मिळवले. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही काम केले.
१९८०मध्ये आलेला आक्रोश त्यांच्या सिनेकरिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. विशेष म्हणजे ओम पुरी यांनी आपल्या करियरची सुरवात घाशीराम कोतवाल या मराठी सिनेमातून केली होती.
त्यानंतर मात्र त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे केले. एखाद्या हिरोसारखी चेहरेपट्टी नसतानाही त्यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले.
अर्ध सत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, देहली ६, मालामाल वीकली, डॉन, रंग दे बसंती, दीवाने हुए पागल, क्यू!हो गया ना, काश आप हमारे होते आणि प्यार दिवाना होता है अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.