मुंबई : अभिनेता सलमान खानला जेल की बेल, याबाबात आज फैसला होणार आहे. मात्र, सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. जामीन नामंजूर झाल्यास तो कोणत्या जेलमध्ये जाईल याची चर्चा आहे.
सलमान खानला रेग्युलर जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावं लागणार हे आज स्पष्ट होईल. अनेक कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सलमानला रेग्युलर जामीन मिळण्यात अडचण येणार नाही. मात्र तरीही हाय कोर्टाचा आदेश येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही.
सलमानचा जामीन नामंजूर झाला आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं तर त्याला कोणत्या जेलमध्ये जावं यावर एक नजर.
महाराष्ट्रात एकूण ९ कारागृह आणि २७ जिल्हा कारागृह असून दहा खुले कारागृह आणि २७ सब जेल आहेत. सलनानचा जामीन नामंजूर झाल्यास सलमानची रवानगी कोणत्या जेलमध्ये होणार, याची उत्सुकता आहे. मुंबईत सर्वात जवळचा कारागृह म्हणजे मुंबईतलं आर्थररोड जेल. इथं अंडर ट्रायल्सचे कैदी ठेवण्यात येतात. त्यामुळे सलमानला इथं ठेवण्यात येणार नाही.. कारण त्याला शिक्षा देण्यात आलीये.. मात्र एका रात्री सलमानला या जेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुस-या दिवशी त्याला वेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात येईल.संजय दत्तच्या बाबतीत असंच झालं होत.
अशात शोध सुरु होतो तो मुंबई बाहेरील मात्र मुंबईच्या जवळच्या एखाद्या सेंट्रल जेलचा यात सर्वात प्रथम क्रमांक लागतो तो ठाणे मध्यवर्ती कारागृह. मुंबईच्या सर्वात जवळ असलेली ठाण्याची सेंट्रल जेल. मुंबईपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर ही जेल असली तरी इथं जागेची कमतरा आहे. शिवाय इथं सुरक्षेचीही मोठी समस्या आहे. कारण या जेलमध्ये मुंबई अंडरवर्ल्डचे अनेक कैदी आहेत ज्यांची जेलमध्ये स्वत:ची गँग आहे.
अशीच काहिशी समस्या तळोजा जेलची आहे... मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेली ही दुसरा जेल. मात्र इथंही अंडरवर्ल्ड डॉन आपल्या गँग ऑपरेट करतात. याच कारणामुळे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर हल्ला करण्यात आला होता. अशात सलमानसाठी दोन जेल सोयीचे ठरतात. तो म्हणजे पुण्यातला येरवडा. आणि दुसरा नाशिक जेल. दोन्हीही जेल मुंबईपासून अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर आहेत.
पुण्यातलं येरवडा कारागृह महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातल्या सर्वात मोठ्या कारागृहांपैकी एक आहे. इथं शिक्षा सुनावण्यात आलेले कैदी ठेवण्यात येतात. तुलनंनं इथे कैदी अधिक सुरक्षीत आहेत. याच कारागृहात सलनाम खानला ठेवण्याची शक्यता आहे. अभिनेता संजय दत्त आपली शिक्षा या तरुंगात भोगतोय.
जर काही कारणास्तव सलमानला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं नाही तर सलमानची रवानगी थेट नाशिक सेंट्रल जेलमध्ये होऊ शकते... हे कारागृह देखील नाशीकपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत अनेक हाय प्रोफाईल कैद्यांना या कारागृहात ठेवण्यात आलंय.
याहूनही आणखी काही पर्याय आहेत. यात कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद सेंट्रल जेल, रत्नागिरी कारागृह यांचा समावेश आहे.
मात्र इथं सलमानला नेण्याची शक्यता कमी आहे. कारण ही कारागृहं मुंबईपासून खूप दूर अंतरावर आहेत. तर काही कारागृहांत मोठी शिक्षा आणि फाशीची शिक्षा दिलेले कैदी आपली शिक्षा भोगताहेत. आणि रिल लाईफच्या कारागृहांपेक्षा रियल लाईफच्या कारागृहांची परिस्थिती खूपच वेगळी असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.