www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुन्हा एकदा कॉलेजेसमध्ये निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे. पण या निवडणुका बंद का केल्या गेल्या, याचा विचार होणंही गरजेचं आहे. कॉ़लेजमध्ये गुन्हेगारी वाढल्यामुळे निवडणुका बंद पडल्या पण या घटना कशा होत होत्या? याचा एक स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये आता पून्हा एकदा निवडणुकींचा गुलाल उधळला जाणार आहे...राज्य सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय़ घेण्याची शक्यता आहे...दोन दशकांनंतर कॉलेजमध्ये पून्हा एकदा निवडणुकींची रणधूमाळी पहायला मिळणार आहे...मात्र यामुळे मुंबईचे रहिवासी असलेले विजय कामथ यांना चिंता सतावू गलीय...कारण १९९१च्या कॉलेज निवडणुकीचा तो अनुभव विजय कामथ कधी विसरु शकणार नाहीत.
त्याकाळी कॉलेजमधील निवडणुकीत दमबाजी, हाणामारी, अपहरण,हल्ले अशा घटना सर्रास घडत होत्या त्यामुळेचं १९९३मध्ये राज्यसरकारने कॉलेजमधील निवडणुका बंद करण्याचा निर्णय घेतला. जवळपास वीस वर्षानंतर आता पुन्हा सरकार कॉलेजमध्ये निवडणुका सुरु करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र त्यावर सरकारने नियंत्रण ठेवलं तरचं या निवडणुकीमागचा उद्देश सफल होईल असं विजय कामथ यांना वाटतंय.
कॉलेजमध्ये निवडणुका घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केलीय. असून त्यावर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे..मात्र दोन दशकांपूर्वी ज्या कारणांसाठी या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती त्याचीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना ? , अशी शंका उपस्थित कऱण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.