www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पूनम पांडे हिचा नशा हा चित्रपट आताच रिलीज झाला. पण या चित्रपटामध्ये चांगलं म्हण्यासारखं असं काहीही नाही, मग असं या चित्रपटामध्ये काय आहे ज्याने तुमच्यावर नशा झाली.
कथानक
या चित्रपटाची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे या चित्रपटाची स्क्रिप्ट. चित्रपट कुठून सुरू होतो, काय चालू आहे आणि कुठे संपतो हे लक्षातच येत नाही. बॉलीवूडमध्ये बोल्ड चित्रपटांचा ऐवढा बोलबाला असता तर मग सनी लियोनचा जिस्म-२ बॉक्स ऑफीसवर पडला नसता. पूनमचे जे फॅन्स तिचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सूक होते, ते सर्व नक्कीच हताश झाले असतील.
‘नशा’ या चित्रपटात एका १८ वर्षीय मुलाची कहाणी आहे, जो २५ वय असणाऱ्या मुलीवर प्रेम करत असतो. पण तो त्या मुलीला मिळवू शकत नाही, कारण ती मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करत असते. त्यामुळे त्या मुलाचे प्रेम हे वेडपणाच ठरतं, या कालावधीमध्ये तो त्या मुलीच्या जास्त जवळ जातो आणि त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध घडून येतात. यानंतर या कहाणीला एक वेगळेच वळण येते.
नशा चित्रपटामधील कोणताही कलाकार प्रभाव टाकू शकला नाही. पूनम पांडे आणि चित्रपटातील कोणत्याही कलाकाराची कला दिसून येत नाही. पूनम पांडे हीला आपले एकही वाक्य नीट बोलता आले नाही. पण तरीही जर का तुम्हाला तिचा हा चित्रपट पाहायचा असेल तर एकदा नक्की बघायला जा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.