चष्मेबद्दूरः फक्त हसा, डोक ठेवा दूर (फिल्म रिव्ह्यू)

दिग्दर्शक- डेविड धवन कलाकार- सिद्धार्थ नारायण, अली जाफर, दिव्येंदू शर्मा, तापसे पानू, ऋषी कपूर, लिलेट दुबे, भारती आचरेकर

Updated: Apr 5, 2013, 07:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिग्दर्शक- डेविड धवन
कलाकार- सिद्धार्थ नारायण, अली जाफर, दिव्येंदू शर्मा, तापसे पानू, ऋषी कपूर, लिलेट दुबे, भारती आचरेकर

चष्मेबद्दूर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला असून डेविल धवनच्या इतर चित्रपटाप्रमाणे हा सिनेमाही कॉमेडीचा धमाका आहे. डेविड धवन म्हटलं की कॉमेडी आणि कॉमेडीच असं सूत्र तयारच झालयं. म्हणून या चित्रपटाच्या बाबतीत वेगळ असं काही सांगायची गरज नाही. १९८० मध्ये सई परांजपे दिग्दर्शित चष्मेबद्दूरचा हा सिक्वेल आहे.
जुन्या चष्मेबद्दूरचा हा सिक्वेल असला तरी त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. डेविड धवन यांनी जुन्या सिनेमातील तीन मित्र आणि एक मुलगी याच सूत्राला नव्या रूपाने मांडलय. तर यातही तुम्हांला डेविड धवन फॉर्म्युला वापरण्यात आला आहे.
या सिनेमाची कथा त्यातील मुलगी आणि तीन मुल आणि त्याचं त्या मुलीबरोबर फलर्टिंग करणं अशीच सुरू होते आणि संपतेही. या सिनेमातून लिलेट दुबे आणि तापसे पानू प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
काय आहे चष्मे बद्दूरची कहाणी
या सिनेमाची कहाणी त्याच भोवऱ्यात अडकून राहते. गोव्याच्या एका वस्तीत सिड (अली जाफर), जय( सिद्धार्थ नारायण) आणि ओमी (दिव्येंदू शर्मा) एकत्र राहत असतात. हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र असतात, पण गोष्ट जेव्हा मुलीवर येऊन थांबते, तेव्हा त्यांची मैत्री तिथेच थांबते. ओमी आणि जय बाजी मारायला पुढे सरसावतात. पण जेव्हा त्याच्या शेजारी सीमा म्हणजे तापसी पानू राहायला येते तेव्हा सार चित्रच बदलत. ओमी आणि जय त्या मुलीला पटवण्यात गंतून जातात. अशाच प्रकारे सिनेमा पुढे जातो.
काय प्लस काय मायनस?
या सिनेमाचा प्लस पॉइंट हा आहे की, ह्या सिनेमाची स्टोरी जुन्या सिनेमापेक्षा वेगळी असली तरी प्रेक्षकांना निराश करत नाही. परंतु अली जाफर सोडून सगळ्यांचा अभिनय निराश करतो. सिनेमात प्रत्येक सीन्सला तुम्हांला हसू आल्याशिवाय राहत नाही. कॉमेडीची ही गाडी शेवटपर्यंत लोकांना खिळवून ठेवते. पण जर तुम्ही नव्या सिनेमाची तुलना जुन्या सिनेमाशी करत असाल तर सई परांजपेचा जुना ‘चष्मेबद्दूर’ पुढे हा सिनेमा कुठेच उभा राहत नाही.

चित्रपटगृहात जाऊन एकदा हसण्यासाठी हा सिनेमा जरूर बघावा.