१३/७ वेदनेचं एक वर्ष...

असं म्हणतात प्रत्येक दिवसावर एका घटनेची नोदं.. किबहूंना प्रत्येक दिवस एका घटनेसाठी ओळखला जातो.. मुंबईच्या इतिहासात अनेक कडू गो़ड आठवणीची मोहोर उमटलेली आहे, अशीच एक तारीख म्हणजे १३ जुलै..

Updated: Jul 13, 2012, 11:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

१३/७ च्या साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली  मुंबई

एक वर्ष उलटूनही सूत्रधार मोकाट

मुंबई स्पिरीटच्या नावाखाली किती दिवस सहन करायचं ?

१३/७ वेदनेचं एक वर्ष...

 

असं म्हणतात प्रत्येक दिवसावर एका घटनेची नोदं.. किबहूंना प्रत्येक दिवस एका घटनेसाठी ओळखला जातो.. मुंबईच्या इतिहासात अनेक कडू गो़ड आठवणीची मोहोर उमटलेली आहे, अशीच एक तारीख म्हणजे १३ जुलै.. बरोबर एका वर्षापुर्वी तीन साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती.. एका वर्षानंतरही मनातली ती सल तशीच आहे.. कारण १२७ मृतांच्या  आणि १२२ जखमीच्या नव्हे तर ही अवघ्या मुंबईची वेदना आहे.. आणि यावरच आहे आजचा प्राईम वॉच.. १३/७ एक वर्ष वेदनेचं. मुंबई बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष होतय. एका पाठोपाठ एक  तीन ठिकाणी झालेल्या स्फोटात 17 जणांचा बळी गेला होता. या स्फोटात अनेकांनी आपले कुटुंबिय गमावले त्यांना या वेदना अजुनही विसरता येत नाही. तर काही जण थोडक्यात वाचले. त्यांना आठवणीने अंगावर शहारे येतात. 45 वर्षीय दिलीप सोनी अजूनही 13 जूलैच्या कटू आठवणी विसरू शकत नाहीत.

 

त्यांनी आपल्या दुकानाच्या कामासाठी आपला 19 वर्षाचा मुलगा पंकज याला झव्हेरी बाजारात पाठवलं होतं. संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याची बातमी पसरताच ते मुलाच्या शोधात बाहेर पडले. यात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. ते हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्यांच्या मुलाचं निधन झालं. मुगला गमावल्याचं दुख इतकं आहे की त्यांनी झवेरी बाजारात जाणं सोडून दिलय. अशीच काहीशी परिस्थिती ऑपेरा हाऊसच्या जवळ काम करणारे केयुर कोठारी आणि कुमारपाल कोठारी यांची आहे. त्यांच ऑफिस ऑपेरा हाऊससमोर होतं. हे दोघे भाऊ ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक स्फोट झाला. त्यांना अनेक महिने हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं. अंगावर असलेल्या जखमांच्या खूणा अजूनही या घटनेची आठवण करून देतात. 13 जुलैला दादर, ऑपेरा हाऊस आणि झव्हेरी बाजारात झालेल्या स्फोटात 17 जणांचा बळी गेला होता.

 

११ जुलैच्या बॉम्बस्फोटांच्या आठवणींच्या मेणबत्या अजुनही विझल्याही नसतील.. आज पुन्हा १३ जुलैच्या मृतांची आठवण काढली जातेय.. प्रत्येक महिन्य़ातली एक तारीख ही मुंबईकरांनी फक्त स्फोटासाठी लक्षात ठेवावी एवढी कृत्य दहशतवाद्यांनी करुन ठेवलीय.. मुंबईवर आजवर झालेल्या दहशतवादी कृत्यांचा इतिहास पाहिला तर खेदांन भय इथले संपत नाही असच म्हणावं लागतय... २६-११ च्या भिषण हल्यातून सावरत असलेल्या चाकरमान्यांना हा सर्वात मोठा धक्का होता.. १३ जुलैच्या संध्याकाळी दुसरा बॉम्बस्फोट झाला तो ऑपेरा हाऊसला.. टाटा रोडवर एका एक्टीव्हात ठेवलेल्या या  बॉम्बचा ६ वाजून ५५ मिनीटांनी स्फोट झाला.  या स्फोटात १५ जण जखमी आणि ७० जण जखमी झाले होते.. झवेरी बाजारात तशी वर्दळ नेहमीच असते..

 

१३ जुलैलाही नेहमीसारखीच गर्दी होती.. संध्याकाळच्या वेळेसही तशीच गर्दी होती.. एवढ्यात कुणालाही कळायच्या आत ६ वाजून ४५ मिनीटांनी एक स्फोट झाला. झवेरी बाजारात सुपर टूल्स शॉपजवळ एका एक्टीव्हात झालेल्या या स्फोटात ११ जण ठार तर ४३ जण गंभीर जखमी झाले होते.. दादरच्या कबुतरखान्याजवळ साखळी बॉम्बस्फोटातील तिसरा स्फोट झाला.. संध्याकाळी ७ वाजून ५ मिनीटांनी झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू तर सुमारे १४ जण गंभीर जखमी झाले होते.. हा स्फोट अवघ्या काही मिनीटांपुर्वी झाला असता तर अनेक निष्पाप चिमुरडी दुर्दैवानं या फे-यात सापडली असती..