संघर्ष इथे संपत नाही.....

उरणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलानं मुंबई महाविद्यालयीन ४०० मीटर स्पर्धेत २१ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. सनी पाटील नावाच्या १९ वर्षीय ऍथलिटनं ४९.४ सेकंदाची वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली.

Updated: Nov 17, 2011, 02:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

उरणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलानं मुंबई महाविद्यालयीन ४०० मीटर स्पर्धेत २१ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. सनी पाटील नावाच्या १९ वर्षीय ऍथलिटनं ४९.४ सेकंदाची वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली. घरची बेताची परिस्थिती आणि माळरानावर सराव करून त्यानं हे यश मिळवलं. ऑटोरिक्षा चालवून सन्नीचे वडील उदरनिर्वाह करतात. रोजच्या जेवणासाठी संघर्ष असताना सन्नीच्या वडीलांनी त्याच्या खेळाकरता मात्र कधीच मागेपुढे पाहिलं नाही .मुलाच्या ऍथलेटिक्समधील गुणवत्तेला न्याय देण्यासाठी त्यांना दररोज संघर्ष करावा लागतो.

 

या प्रतिभावान खेळाडूचा संघर्ष इथंच थांबत नाही. उरणसाख्या ग्रामीण भागात त्याला सरावासाठी पायाभूत सुविधा असलेलं मैदानही त्याला उपलब्ध नाही. मात्र अशा प्रतिकूल परिस्थीतीतही तो राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवतो.

 

जिद्द आणि दृढनिश्चियी सन्नीचा सघंर्ष अजूनही सुरुच आहे. त्यानं मुंबईत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ४०० मीटरमध्ये २१ वर्ष जुना विक्रम मोडीत काढून प्रतिभेचा प्रत्येयच दिला. मात्र सन्नीला इथंच थांबायचं नाही. ऑलिंपिक खेळण्याच स्वप्न त्यानं उराशी बाळगलं आहे. त्याच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी गरज आहे ती त्याला आर्थिक बळ देण्याची.