फोटोग्राफरचे अश्लील धंदे

७४ वर्षीय नरसी कतरिया हे एक प्रोफेशनल फोटोग्राफर. एक नावाजलेला फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख. मात्र त्याचा आता खरा चेहरा उघड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण या फोटोग्राफऱचा खरा धंदा अश्लील चित्रफित तयार करण्याचा होता.

Updated: Nov 23, 2011, 12:27 PM IST

[caption id="attachment_8491" align="alignleft" width="150" caption="नरसी कतरीया"][/caption]

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

७४ वर्षीय नरसी कतरिया हे एक प्रोफेशनल फोटोग्राफर. एक नावाजलेला फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख. मात्र त्याचा आता खरा चेहरा उघड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण या फोटोग्राफऱचा खरा धंदा अश्लील चित्रफित तयार करण्याचा होता.

 

पेशानं फोटोग्राफर असलेल्या या ७४ वर्षीय नरसी कतरियाने जे कृत्त्य केलंय,त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडालीय. एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून परिसरात नावाजलेल्या या नरसी कतरियाचा खरा चेहरा उघड झालाय..फोटोग्राफी आणि एडिटिंग शिकवण्याच्या नावाखाली मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर बलात्कार करून त्याची अश्लील सीडी बनविण्याचा या नरसी कतरियाचा खरा धंदा. गेल्या अनेक वर्षापासून मुलुंडमधल्या एका पॉश फ्लॅटमध्ये आरोपी नरसी कतरियाचा हा धंदा सुरु होता. मात्र अखेर त्याचं बिंग फुटलं आणि तो गजाआड झाला. एका पीडित मुलीने आरोपी नरसीच्या या काळया धंद्याचा पर्दाफाश केला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नरसी हा एक सधन कुटूंबातून असुन तो एक प्रोफेसनल फोटोग्राफर आहे. आरोपी नरसी हा प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून मुलुंडमध्ये नावारुपाला आला होता..फ्लोरा अपार्टमेंटमध्ये त्याचे दोन फ्लॅट आहेत.गेल्या पाच वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. तो बैचेन राहू लागला होता. तो अत्यंत चलाख आहे. त्यानं अनेक मुलींना फोटोग्राफी आणि एडिटींग शिकविण्याचं आमिष दाखवलं.फोटोग्राफी आणि एडिटींग शिकायला मिळेल म्हणून अनेक मुली त्याच्याकडे येऊ लागल्या. त्यानं चांगला जम बसवला होता. मात्र त्यामागचा हेतू हा काही वेगळाच होता. तो स्वतःला फेसरीडर म्हणूनही बतावणी करु लागला होता. अशा पध्दतीने आरोपी नरसीने अनेक अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. मात्र एकदा ती मुलगी त्याच्या जाळ्यात अडकली की मग तीचं आयुष्य उध्वस्त होऊन जायचं. कारण या विकृती मानसिकतेच्या नरसीने त्या मुलींना फोटोग्राफी शिकविण्याच्या नावाखाली त्यांची अश्लील चित्रफित तयार करण्याचा धंदा सुरु केला होता. तो मानसिकरित्या सुदृढ आहे.

अत्यंत चलाखीने त्याना त्याचा धंदा सुरु ठेवला होता.एकदा का पीडित मुलींची अश्लील चित्रफित तयार केली,मग तो त्या मुलींना ब्लॅकमेल करु लागला होता..ती अश्लील चित्रफित सार्वजिनक कऱण्याची भीती दाखवून तो त्यांना ब्लॅकमेल करायचा. आरोपी नरसी हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असल्यामुळे त्याला कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान अवगत होतं. त्यानं आपल्या राहत्या फ्लॅटमध्येच ठिकठिकाणी कॅमेरे लावले होते आणि याच कॅमे-यांच्या मदतीने तो अश्लील चित्रफित तयार करायचा. ती चित्रफित तो आपल्याकडे सीडींच्या रुपाने ठेऊ लागला होता.

 

फ्लोरा अपार्टमेंटमधल्या त्याच्या सहाव्या माळ्यावर हा त्याचा धंदा सुरु होता. त्याच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्याच्यावर संशय होता. मात्र त्यांच्या हाती काही सबळ पुरावे मिळत नव्हते. गेल्या अनेक दिवंसापासून आरोपी नरसी कतरियाचा हा धंदा सुरु होता. मात्र एका पीडित मुलीने मोठ्या हिंमतीने तीच्यावर बेतलेल्या या प्रसंगाची माहिती आपल्या शिक्षिकेला सांगितली आणि त्या शिक्षिकेच्या मित्राने आरोपी नरसी कतरियाचा या अश्लील धंद्याचा पर्दाफाश केला. घटनेच्या दिवशी आरोपी नरसी कतरियाला रंगेहाथ गजाआड करण्यात आलं.

 

याप्रकरणी आरोपी नरसी कतरियाला अटक केली असुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. न्यायालयाने आऱोपीला २६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय..मात्र ७४ वर्षीय आरोपी नरसी कतरियाच्या या कारनाम्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी नरसीला त्याच्या  या धंद्यात आणखी कोणी मदत केलीय याचा आता पोलीस शोध घेत आहेत.