गुन्हेगारीत महिलाही मागे नाहीत

Updated: Dec 17, 2011, 11:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

राजकारणात, नोकरीत आणि वाढत्या आरक्षणात महिलांचा टक्का वाढत असताना गुन्हेगारीतही त्या मागे नाहीत. नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीत महिलांचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यानं नाशिक पोलिसांनी महिलांवर तडीपारीची कार्यवाही सुरु केली आहे.

 

नाशिकमध्ये पकडण्यात आलेल्या या बबलीनं तिच्यासोबत असलेल्या बंटीबरोबर अनेक घरफोड्या केल्यात. चो-या करण्यात हि तरबेज असून तिच्याकडून पन्नास तोळे सोनं आणि रोकड जप्त कऱण्यात आलीय. अशाच पद्धतीनं धमक्या देणं, जागा बळाकावणं या कारवाईसाठी गंगुबाई शिंदे आणि राधा शिंदे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनंदवली शिवारात राहणा-या निर्मला जाधव या महिलेविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.

 

इथल्या मुंबई नाका परीसरात अवैध व्यवसायातल्या एका तरुणीचा खून करण्यात असून, अनैतिक व्यवसायातील स्पर्धेतून तिचा खून करण्यात आलाय. याप्रकरणी अटक केलेल्या तिघा तरुणांनी अवैध कामात असणा-या अनेक एजंट महिलांचा खुलासा केलाय. आधुनिक जीवनशैलीचे चोचले पुरविण्यासाठी लागणारा पैसा कमावण्यासाठी महिलांचा गन्हेगारीत वावर वाढत असल्याचं तज्ज्ञांना वाटतयं.

 

घरातील एक महिला शिकली की संपूर्ण घर सुशिक्षित होतं. मात्र गुन्हेगारीतल्या सर्व क्षेत्रात पारंगत होत असलेल्या महिलांमुळं पोलिसांनी तडीपारीचे हत्यार उपसलंय.

 

[jwplayer mediaid="14807"]