दहावी परीक्षा निकालाची तारीख आज होणार जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकालाची आज तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 6, 2015, 01:07 PM IST
दहावी परीक्षा निकालाची तारीख आज होणार जाहीर title=

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकालाची आज तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल लागण्यास उशीर झालाय. मात्र, ६ जून २०१५ रोजी दहावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील नऊ मंडळाच्या निकालाची तारीख आज घोषित होण्याची शक्यता आहे. यात पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर आदी मंडळांचा समावेश आहे.

दहावीचा निकाल सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते. मात्र, राज्य माध्यमिक मंडळाने याबाबत अधिकृत तसे जाहीर केलेले नाही.

निकाल पाहण्यासाठी

> mahresult.nic.in

> mahahsscboard.maharashtra.gov.in 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.