इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर

 मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. 

Updated: Nov 14, 2016, 10:03 PM IST
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची खूशखबर title=

नवी दिल्ली :  मनुष्यबळ विकास विभाग लवकरच ऑनलाइन IIT-PAL नावाची एक नवी व्यवस्था उभी करणार आहे. ज्यामुळे फ्रीमध्ये IIT चं शिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. 

ऑनलाइन IIT-PAL नुसार आम्ही इंजीनियरिंग करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये कोचिंग कोर्ससंबंधित सामग्री, ट्यूटोरियल, डिस्कशन फोरम आणि इतर परीक्षा उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी मनुष्यबळ विकास खाते चांगल्या शिक्षण सामग्रीला एकत्रित करणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना मोठी फीची रक्कम भरावी लागते. यासाठी काही टीव्ही चॅनेल्सने देखील सरकारसोबत हात मिळवल्याची माहिती आहे. जावेडकर यांनी म्हटलं की, 'याचा अशा विद्यार्थ्यांना फायदा मिळेल ज्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळत. त्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढतं.'