www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई बोर्डाचा 10 वी चा गणिताचा पेपर फुटलाय. कांदीवलीच्या वाय बी चव्हाण शाळेत हा प्रकार उघड झालाय. पेपर सुरू असताना विद्यार्थ्याजवळ त्याच पेपरची प्रश्नपत्रिका सापडली.
हा विद्यार्थी बाहेरून परीक्षा देत होता. विद्यार्थ्याजवळ प्रश्नपत्रिका सापडल्यावर त्याच्याविरोधात बोर्डाने तक्रार दाखल केलीय. अवघ्या 500 रूपयांत त्याने ही प्रश्नपत्रिका मिळवल्याचं उघड झालंय.
दरम्यान विद्यार्थ्याकडे हा पेपर कुठून आला आणि इतर विद्यार्थ्यासोबत शेअर केला का..या दृष्टीनेही तपास सुरू आहे. लाय. कांदिवलीतल्या एका शाळेत हा पेपरफुटीचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दहावीचा पेपर फुटल्याची तक्रार काही पालकांनी कांदिवलीतल्या पोलिसांत नोंदवलीय. या प्रकरणी पोलीस आणि बोर्डानं चौकशी सुरू केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.