छोट्या दोस्तांसाठी 'डिस्कव्हरी किडस्'

‘डिस्कव्हरी’ चॅनेलवर मोठ्यांनाही नव्या नव्या गोष्टी बघायला आवडतात. आता हेच डिस्कव्हरी छोट्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतंय एक नवं चॅनल...

Updated: Aug 1, 2012, 04:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

‘डिस्कव्हरी’ चॅनेलवर मोठ्यांनाही नव्या नव्या गोष्टी बघायला आवडतात. आता हेच डिस्कव्हरी छोट्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतंय एक नवं चॅनल...

 

नुकतीच ‘डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिक’नं लहान मुलांसाठी एक नवं चॅनल सुरू करण्याची घोषणा केलीय. या चॅनलचं नाव असेल ‘डिस्कव्हरी किडस्’. 4 ते 11 वर्षांच्या मुलांची मानसिकता लक्षात घेऊन या चॅनलवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. 24 तास सुरू असणारं हे चॅनल इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत उपलब्ध होईल. मुलांमध्ये गुणवत्तापूर्ण श्रेणीची कमतरता हे चॅनल पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या आठवड्यापासून या चॅनलच्या वेबसाईटची सुरूवात होणार आहे.

 

भारतात 1995 पासून डिस्कव्हरी चॅनलची सुरूवात झालीय. याच कंपनीची टीएलसी आणि अॅनिमल प्लॅनेट या नावाची आणखी दोन चॅनल्सचं प्रसारण भारतात सुरू आहे. भारतात 37 करोड मुलांसाठी फक्त 5-6 चॅनल्स उपलब्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रात जास्त संधी असल्याचं डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिक’ला वाटतंय.

 

.