दीपावलीनिमित्त बेटी बचावचा संदेश

दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये सर्वात मोठा आकाशकंदील तयार करण्यात आलाय. तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केलाय. त्यांनी यातून बेटी बचावचा संदेश दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com,नाशिक/भंडारा
दीपावलीनिमित्त नाशिकमध्ये सर्वात मोठा आकाशकंदील तयार करण्यात आलाय. तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केलाय. त्यांनी यातून बेटी बचावचा संदेश दिला आहे.
हा भव्य असा आकाश कंदील १०८ फूट उंच आणि ४० फूट रुंद आहे. विशेष म्हणजे हा कंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. या कंदीलाला चार चौकटी, आठ त्रिकोण असून सात रंगाचं कापड वापरण्यात आलंय. अनंत कान्हेरे मैदानात टांगलेला हा भव्य आकाशकंदील दिवाळीतलं नाशिकरांचं आकर्षण आहे. प्रसाद पवार फाऊंण्डेशनच्या माध्यमातून आणि अनमोल नयनतारा संस्थेच्या सहकार्यानं हा आकाशकंदील उभारण्यात आला.
" अंधार खूप झाला, पणती जपून ठेवा" असा संदेश देत भंडारा जिल्ह्यातील आसगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीनं दीपोत्सव साजरा केला. स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता या विद्यार्थिनींनी असंख्य दीपप्रज्वलित करून बेटी बचावचा संदेश दिला .तर लहान मुलांनी देवतांचं रूप धारण करून बेटी बचावचा संदेश उपस्थितांना दिला.