तुमचा इतरांपेक्षा वेगळा स्वभाव म्हणजे तुम्ही अत्यंत चिकित्सक आहात. काही पण होऊ दे, पण बुध्दी पणाला लावून प्रत्येक गोष्टीचा तुम्ही बारकाईने किस काढतात. अशामुळे काय होतय बुध्दीमान असूनही बुध्दीचा योग्य वेळी योग्य वापर केला जात नाही. बुध्दीचा वापर चुकीच्या पध्दतीने झल्यामुळे तुमच्या वरती पश्चाताप करण्याची वेळ येते.
तुम्ही खूपच प्रेमळ हळव्या स्वभावाचे नम्र सभ्य आहात. तरीही तुमचे कौटुंबिक जीवन मात्र फारसे समाधानी नसते. तुमच्या प्रेमामध्ये जिव्हाळा, उत्साह, भावनिकता असते. परंतु, तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षा ही उच्च असतात.
आनंदी उत्साही असून तितकेच तुम्ही मुडी ही आहात.
उत्साहीत असाल ना तर येईल त्या संकटावर मात करुन नक्कीच ध्येय गाठतात आणि जर उदासीन झालात तर प्रगती करुन तरी काय करायच असं तुमचं मत होतं. त्यामुळे जाताना सगळ इथच सोडून जायचय, ज्या शरीराचे आपण आयुष्य भर लाड पुरविले ते मेल्यावर कुठे कसे पडेल तेच माहीत नसते हो. असे म्हणून निवांत राहतात.
तुम्ही उदासीन स्थितीमध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. खरेतर इतके उदासीन तुम्ही राहूच नयेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही उदासिनता टाळण्यासाठी हळवेपणाने प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याचा तुमचा स्वभाव तुम्ही सोडुन द्या. प्रगतीच्या टप्प्यातील महत्वाचा अडथळा उदासीनता मरगळ असते हे लक्षात ठेवा. तुम्ही समोरच्याला समजावून सांगून समजून घेणारे असे आहात.
पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.